पनवेल दि. ०७ ( वार्ताहर ): कामोठे वसाहतीमधील व्यंकट प्रेसिडन्सी हॉटेल मध्ये चालणाऱ्या हुक्का पार्लरवर कामोठे पोलिसांनी कारवाई करून तेथे वापरात येणारा हुक्का व इतर सिगरेट तंबाखू उत्पादने ताब्यात घेण्यात आली आहेत.
कामोठे वसाहतीमधील व्यंकट प्रेसिडन्सी हॉटेलमध्ये सुरु असलेल्या हुक्का पार्लर विरोधात व तेथे झालेल्या मारामारी संदर्भात तक्रारी आल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक संदेश कोठावळे व त्यांच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून
हुक्का पार्लर मालक राजेंद्र तेली यांच्या सह तेथील मॅनेजर आणि तीन ग्राहक अश्या एकूण सहा जणांविरोधात सिगरेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ चे कलम ४,७,२१ व सुधारणा अधिनियम सन २०१८ चे कलम ४(अ ) व २१ (अ) अन्वये कारवाई करून तेथे असलेले पॉटबेस, विविध प्रकारची फ्रुट फ्लेवर, मसाला फ्लेवर पाकीट व इतर साहित्य असा मिळून ५,१०० रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे .
Tags
पनवेल