पनवेल
कामोठे वसाहतीमधील वेंकट प्रेसिडंसी हॉटेल हुक्का पार्लरमध्ये झालेल्या राड्यात एक युवक गंभीर जखमी झाला आहे. गुरुवारी ( ता.4) घडलेल्या या घटने प्रसंगी मारहाण झालेला युवक आपल्या मित्रांसहीत हुक्का पार्लरमध्ये बसलेला असताना 20 ते 25 जणांच्या टोळक्याने ही मारहाण केली असल्याचे चित्रण हॉटेलमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच कामोठे पोलीस ठाण्यातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र त्या पूर्वीच हल्लेखोर घटना स्थळावरून पसार झाल्यामुळे मारहाण झालेल्या युवकाच्या सांगण्यावरून कामोठे पोलिसांनी चार ते पाच संशयिता विरोधात दंगलीचा गुन्हा नोंदवाल असून,एका संशितांला ताब्यात घेतले असल्याची माहिती मारहाण झालेल्या युवकांच्या नातेवाईकांना कामोठे पोलीसानी दिली आहे.
दरम्यान रात्री दहाच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे कामोठे वसाहतीमधिल युवकांना कशा प्रकारे हुक्क्याचा विळखा बसलाय हे स्पष्ट होत असून,वसाहतीमध्ये रात्री उशिरा पर्यत बेकायदेशीरपणे चालणाऱ्या हुक्का पार्लरवर वरदहस्त कोणाचा असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
Tags
कामोठे