वाको महाराष्ट्र सिनियर आणि मास्टर चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत शुभम म्हात्रे यांना सुवर्ण पदक.







वाको महाराष्ट्र सिनियर आणि मास्टर चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत शुभम म्हात्रे यांना सुवर्ण पदक.


उरण दि 10(विठ्ठल ममताबादे )
वाको महाराष्ट्र सिनियर आणि मास्टर चॅम्पियनशिप 2023 पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत शुभम परशुराम म्हात्रे(जासई -उरण )याला( किक लाईट - 69) या प्रकारामध्ये सुवर्ण पदक व (क्रियेटिव्ह टीम फॉर्म )या प्रकारामध्ये सुवर्ण पदक मिळाले असून त्याची निवड वाको नॅशनल सिनियर चॅम्पियनशिप पंजाब येथे झाली आहे.




त्यासाठी रायगड जिल्ह्यातील कोच संतोष मोकल व जीवन सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.सदर स्पर्धा ही बालेवाडी स्टेडियम पुणे येथे 4 जुन रोजी झाली. त्या स्पर्धेसाठी वाको गुजरात चे प्रेसिडेंट सिद्धार्थ सर तसेच वाको महाराष्ट्र प्रेसिडेंट निलेश शेलार व वाको महाराष्ट्र टीमचे सर्व सिनियर उपस्थित होते. 




या स्पर्धेचे उदघाटन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मराठी सिंगर खंडेराया झाली माझी दैना या सुप्रसिद्ध गाण्याचे सिंगर व कंपोसर वैभव लोंढे यांच्या हस्ते झाले.या स्पर्धेत 27 जिल्ह्यातील 278 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. उरण तालुक्यातील जासई गावचे सुपुत्र शुभम परशुराम म्हात्रे यांना स्पर्धेत सुवर्णपदक मिळाल्याने तसेच उत्तम कामगिरी केल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


थोडे नवीन जरा जुने