उरण दि 10(विठ्ठल ममताबादे )उरण मधील सामाजिक कार्यकर्ते दिलीप साळुंके यांचे सुपुत्र सात्विक साळुंके यांच्या प्रथम वाढदिवसा निमित्त उरण तालुक्यातील पुनाडे धरण वाडी वरील 20 शाळकरी मुलांना कपडे, खाऊ व शालेपयोगी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी शिक्षक दिलीप म्हात्रे ,रुपाली फडतरे,दिलीप साळुंके, सिंधू साळुंके,सात्विक साळुंके व इतर मान्यवर उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवसा निमित्त दिलीप साळुंके यांनी आपला मुलगा सात्विक याच्या प्रथम वाढदिवसा निमित्त गोर गरिबांना शिक्षणासाठी मदत केल्याने त्यांच्या या निर्णयाचे, उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे
. वाढदिवसाच्या निमित्ताने का होईना असे समाजपयोगी उपक्रम समाजात झाले पाहिजेत. जेणेकरून गोर गरिबांना कुठेतरी आधार मिळेल. त्यांच्या जगण्याला बळ मिळेल अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.
Tags
उरण