मे. जे एम बक्षी (एमआयसीटी -2) कंपनी मु. कळंबुसरे ता. उरण, जि. रायगड या कंपनीमध्ये राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (आरएमबीकेएस ) युनियन स्थापन.
उरण दि 10(विठ्ठल ममताबादे )
मे. जे.एम. बक्षी (एमआयसीटी -2) कंपनी मु. कळंबुसरे ता. उरण, जि. रायगड या कंपनीमध्ये लोकल लेबर कामगारांतर्फे राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (आरएमबीकेएस ) युनियनची स्थापना करण्यात आली.
सदर युनियनच्या नामफलकाचे उद्घाटन कामगार नेते संतोषभाई घरत (राष्ट्रीय उपाध्यक्ष-आरएमबीकेएस) यांनी केले व कामगारांना मार्गदर्शन रायगड जिल्हा अध्यक्ष गणेश यशवंत पाटील यांनी केले. हि युनियन कामगारांच्या भल्यासाठी आहे आणि कामगारांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही असे संतोषभाई घरत यांनी अध्यक्षीय भाषणात म्हटले.व कामगारांनी ताबडतोब आपल्या समस्याची माहिती द्यावी तुमच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत,
आपल्याला कोणतिही अडचन आली तर युनियन आपल्या पाठीशी थंबीरपणे उभी राहील असे विचार गणेश यशवंत पाटील यांनी व्यक्त केले. कार्यक्रमात युनिट अध्यक्ष विशाल पाटील, उपाध्यक्ष संतोष पाटील, कार्याध्यक्ष प्रसाद पाटील, खजिनदार प्रणय पाटील इतर कामगार नयना नाईक, सपना पाटील, विक्रांत पाटील, रूपेश पाटील, नितीन म्हात्रे तसेच सि.डब्ल्यु.सी द्रोणागिरी कंपनीचे कार्याध्यक्ष समीर म्हात्रे, कॅान्टीनेंटल कंपनीचे युनिट उपाध्यक्ष अच्युत ठाकूर, ट्रान्सइंडीया कंपनीचे युनिट अध्यक्ष रामेश्वर पाटील व अमेया कंपनीचे सचिव समशाद खान इतर कंपन्यांचे कामगार उपस्थित होते.
Tags
उरण