पनवेल दि.२३ (संजय कदम) : खारघर तळोजा कॉलनीज वेल्फेअर असोसिएशन यांनी खारघर सेक्टर 35 मधील साई हरिद्रा आणि साई वंडर समोर पनवेल महानगरपालिकेच्या मोकळ्या भूखंड क्रमांक 1 चे संवर्धन आणि विकासासाठी सातत्याने केलेले प्रयत्न आणि पाठपुरावा अखेर फळाला आला आहे.
पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख आणि उपायुक्त कैलास गावडे यांनी ही जागा महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील पहिल्या मनोरंजन उद्यानासाठी आयकॉनिक प्रकल्प म्हणून विकसित करण्याच्या योजनेला मान्यता दिली आहे.
सदर ठिकाणी पनवेल कार्यक्षेत्रातील प्रत्येक नोडच्या हेरिटेजचा उल्लेख करणारी टॉय ट्रेन असेल. तसेच या उद्यानात रहिवाशांसाठी एक दिवसाचे पिकनिक स्पॉट ठेवण्यासाठी इतर विविध मनोरंजन कार्यक्रम असतील. हे उद्यान किमान शुल्क आकारणीवर असेल. तसेच मैदानात मॉर्निंग वॉकसाठी जागा निश्चित केली जाईल आणि व्हॉली बॉलचे खुले मैदान असणार आहे.
या प्रकल्पासाठी सहा कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. याबद्दल मंगेश रानवडे, इम्तियाज शेख, गिरीश दिवेकर, ज्योती नाडकर्णी, श्री चंद्रप्रकाश, मेजर नायर, सैफुल्ला खान आणि अनेक रहिवाशांनी महापालिकेकडेकडे सक्रियपणे पाठपुरावा केला होता. या नवीन उपक्रमाबद्दल पनवेल महानगरपालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत.
Tags
पनवेल