केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले संसारे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन






केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले संसारे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन
पनवेल दि.०१ (वार्ताहर) : स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज संसार यांचे नुकतेच दुःखद निधन झालेले आहे. त्यानिमित्त मनोज संसारे यांच्या कुटुंबीयांची केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भेट घेतली व सांत्वन केले. 



           स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज संसारे यांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम ४ जून रोजी पेण येथे आयोजित करण्यात आला आहे . या कार्यक्रमाच्या पूर्व तयारीसाठी पेण येथील सर्व कार्यकर्त्यांची बैठक महेश साळुंखे यांनी घेतली. हा कार्यक्रम युवा नेते अनिकेत संसारे, सुमित संसारे, आणि सागर भाई संसारे यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आला आहे .


 या कार्यक्रमाकरिता पक्षाचे नेते बाळाराम जाधव, अमित हिरवे, अशोक वाघमारे हे नेते उपस्थित राहणार आहे. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता रायगड जिल्हा उपाध्यक्ष विजय धोत्रे, अमित कांबळे, नागेश सुर्वे, मुमताज पठाण, भारत दाताड, दिलीप नाईक, समाधान कांबळे इत्यादी कार्यकर्ते नियोजन करीत आहेत.




थोडे नवीन जरा जुने