पोलीस ठाण्यात येणाऱ्या तक्रारदारांच्या तक्रारीचे निवारणास प्राधान्य - सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूतपोलीस ठाण्यात येणाऱ्या तक्रारदारांच्या तक्रारीचे निवारणास प्राधान्य - सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत*
पनवेल दि. १३ (संजय कदम) : पोलीस ठाण्यात आपल्या तक्रारी घेऊन येणाऱ्या तक्रारदार्यांच्या समस्या एकूण घेऊन त्या त्वरित सोडवण्यास प्राधान्य द्यावे असे आवाहन पनवेल परिमंडळ २ चे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी पदभार स्वीकारताना पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले आहे.                अशोक राजपूत यांची पनवेल परिमंडळ २ चे सहाय्यक पोलीस आयुक्तपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच ठाणे व नवी मुंबई क्षेत्रात कार्यरत होते. त्यांनी आपला पदभार स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. 


तसेच त्यांनी सांगितले कि, पनवेल परिमंडळ २ अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक पोलीस ठाण्यात आपल्या तक्रारी घेऊन येणाऱ्या तक्रारदार्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्यावर ते त्वरित सोडवण्यास प्राधान्य द्यावे अश्या सूचना करणार आहे. त्याचप्रमाणे तक्रारधारकांसोबत आपुलकी वागून त्यांची नेमकी समस्या जाणून घ्यावी व त्या दिशेने पाऊल टाकावे असे आवाहन पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना केल्याचे सांगितले. त्याचबरोबर सध्या राज्यभरात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व स्टेटस यामुळे पनवेल परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याबाबत खबरदारी बाळगणार असल्याचे सांगितले. तसेच सध्या वाढत असलेल्या ऑनलाईन फसवणूक बाबत नागरिकांनी सावध राहावे असे आवाहन करतानाच फसवणूक झाल्यास त्वरित आपल्या नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास सांगितले. दरम्यान नवनियुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी मावळते सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनावणे यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी तेथील कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी भागवत सोनावणे यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांना निरोप दिला.     

   

थोडे नवीन जरा जुने