भाजप शहर खजिनदार संजय जैन यांनी सामाजिक बांधिलकीद्वारे वाढदिवस केला साजरा


भाजप शहर खजिनदार संजय जैन यांनी सामाजिक बांधिलकीद्वारे वाढदिवस केला साजरा   
पनवेल दि. १३ (संजय कदम) : भारतीय जनता पार्टीचे पनवेल शहर खजिनदार आणि समाजसेवक संजय जैन यांनी आपला वाढदिवस लहान मुलांना शालेय वस्तूंचे वाटप करून लहानग्यांच्या साथीने साजरा केला.  भारतीय जनता पार्टीचे पनवेल शहर खजिनदार समाजसेवक संजय जैन यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीद्वारे झाला. वाढदिवसानिमित संजय जैन यांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या.


 संजय जैन आपला वाढदिवस दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवा साजरा करत असतात. यंदाही त्यांनी वाढदिवसानिमित्त पनवेल शहरातील लक्ष्मी वसाहत येथे ओम साई मित्र मंडळातर्फे लहान मुलांना शालेय वस्तूंचे वाटप केले. यावेळी संजय जैन यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी संजय जैन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.थोडे नवीन जरा जुने