लेख व्यसनमुक्तीचे आवाहन



लेख__
व्यसनमुक्तीचे आवाहन

एखाद्याची तंबाखू खाऊनही अपवादानेच प्रतिकार क्षमता चांगली असल्यामुळे त्याला कदाचित कर्करोग झाला/ होत नसेलही परंतू तरी त्याने तसा फाजील अभिमान बाळगण्यात काहीच तथ्य नाही. अथवा तसा चुकिचा निष्कर्श काढून


निर्धास्तपणाने व्यसनाधीन होणे किंवा त्या व्यसनांचे समर्थन करणे साफ चुकिचे आहे.समाजातील असेच काही महाभाग स्वतची भोळी समजुत काढुन “केवळ तंबाखुनेच कर्करोग होतो असे काही नाही असे छातीठोकपणे समर्थन करतांनाही दिसतात. स्व:तचे तर्क लावतात परंतू ऊत्तेजित करनार्या दारू/ तंबाखू/ चरस/ गांजा/ गुटका याच्या केवळ व्यसनांमुळे शुक्राणुची अकार्यक्षमता पुढिल पिढीला कमजोर बनवितात याचा विसर पडून अमूक अमूक व्यक्तीला किंवा फल्याण्याला काडीचे व्यसन नसतांना /साधे चहा प्यायची सवय नसतांना त्याला कॅन्सर झाला”अशी काहीही व्यसन नसतांना कॅन्सर झाल्याचे उदाहरणे देत इतरांनाही तसा दुश्वास दाखवतात.त्यांनी या भयानक वस्तूस्थितीचे वास्तव समजावून घेणे खुप गरजेचे आहे.त्यांची अशी भोळीभाबडी गैरसमजूत दूर करून घेतांना स्व:तची आणि इतरांचीही फसवणुक आता थांबविली पाहिजे.
जवळच्या कर्करोग हॅास्पिटलला भेट देऊन


तेथील पिडीत बालरूग्ण बघावेत. आपल्या भावी पीढिला आपल्याकडून नकळत किती अकार्यक्षम शुक्राणुची भेट देत पुढच्या येणार्या पीढिला मागिल पिढींनी सेवन केलेल्या व्यसनांचे दुष्परिणाम दाखवणारे असे किती भयानक भोग भोगावयास लागतात हे त्या पिडीत बालरूग्णांची केमोथेरपी (विषप्राशन केल्यावर मनुष्य पांढरा फटपटीत पडतो) झाल्यानंतरची दयनीय हालाकिची भयावह अशी अनावस्था बघून प्रचिती होते.त्यांच्या हेलावनार्या ,मनाला हवालदिल करनार्या असह्य वेदना आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष बघितल्यावर. अशा व्यक्ती त्वरीत तंबाखु गुटका वर्ज करतील..
कुणाचाही पुढिल वंश अशा काही असहाय्य व्याधींचा शिकार होईल याची किंचितही कल्पना मनाला शिवून गेली तरी अंगाला शहारे येतात



पिडीत कुटुंबाची होणारी केविलवाणी वाताहत ,रूग्णाची होणारी अकारण अवहेलना अजिबात बघवत नाही .
आपल्या व्यसनाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपल्या कुटुंबावर पर्यायाने भावी वंशावर काय परिणाम होतो हे समजून घेणे महत्वाचे आहे आणि हे व्यसन थांबवणे सक्त गरजेचे आहे. आता ही धोक्याची घंटा वाजत आहे.



मी स्व:त,माझ्या निकडीचे ३ निकट/नातेवाईक १ मित्र,या कर्करोगरूग्णांशी झुंजतांना बघितलेले आहे.आणि सोबत त्या त्या कुटुंबियांची वाताहत होतांना प्रत्यक्ष अनुभवलेले आहे,म्हणूनच तळमळीने गेली १० वर्षापासून दरवर्षी ५० व्यसनमुक्ती करण्याचे ध्येय बाळगून आव्हाहन करत आहे.आज आपणापर्यंत हि विनवणी करून बिनदिक्कत माझे मत प्रदर्षित करीत आहे.




थोडे नवीन जरा जुने