गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव






गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
संजय कदम_वरिष्ठ पत्रकार 
पनवेल दि.२८ (संजय कदम) : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) देवद शाखेतील उपविभाग प्रमुख जयंत पाखरे, विभागप्रमुख विशाल भोईर यांच्या संकल्पनेतून दहावी मध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मानधन, शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 



   शिवसेनेचे डाॅ. आशिष बांदेकर, भाटिया शाळेतील शिक्षक आश्विन अहीरे व रविंद्र पवार यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी दहावी मध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या सई मोहिते, व्दितीय क्रमांक अथर्व मोहिते, तृतीय क्रमांक चिन्मय साऊल यांना मान्यवरांच्या हस्ते मानधन व सन्मानचिन्ह तर गुणवंत विद्यार्थ्यांना शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.



 यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बडे, संदिप तांडेल, शहरप्रमुख अजय गोयजी, बिपिन झुरे, सुकापूर शाखाप्रमुख हनुमंत खंडागळे, महिला संघटनेचे तनुजा झुरे, शारदा पाटील, शिवसेना विभाग प्रमुख विशाल भोईर, उपविभाग प्रमुख जयंत पाखरे, शाखाप्रमुख श्रीकांत सरलेकर, उप शाखाप्रमुख दिपक दळवी, गट प्रमुख भिकाजी चव्हाण, जयवंत खुजे, राजेश वायरे, तसेच देवद युवासेनेचे सुमित कदम, सुरेश माने, सिध्देश चव्हाण, सुमित कदम, योगेंद्र यादव, प्रभाकर कुळये, संजय घाणेकर, उदय चव्हाण, विनोद मोरे,ज्ञानेश्वर गोरे,अनंता लंबाडे, जयवंत खुजे, मनोहर कदम, हेमंत म्हात्रे, नंदकिशोर मांजरेकर यांच्यासह युवासेनेचे कार्यकर्ते, पालक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने