प्रशांत पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजराप्रशांत पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

उरण दि 3 ( विठ्ठल ममताबादे ) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिणीस प्रशांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे उरण तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

 विविध सामाजिक उपक्रम राबवून राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळे व ब्लॅंकेट वाटप करण्यात आले तर इंदिरानगर झोपडपट्टी बोरी येथे लहान बालकांना व शाळेतील विद्यार्थ्यांना वही व दप्तर या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.सर्वसामान्यांचे नेते, प्रदेश सरचिणीस प्रशांत भाउ पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिल‌की जपत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गणेश नलावडे, शहराध्यक्ष तुषार ठाकूर यांनी दिली. यावेळी जिल्हा सरचिटणीस गणेश नलावडे, नेते परीक्षित ठाकूर, शहराध्यक्ष तुषार ठाकूर, कार्याध्यक्ष मंगेश कांबळे, जेष्ठ नेते किशोर ठाकूर,सुरेश साळुंके,जिल्हा सचिव आनंद भिंगार्डे,शहर उपाध्यक्ष दशरथ चव्हाण, कार्यकर्ते भूषण ठाकूर, अनंत मोरे, लक्ष्मण लवे, महेश चांदेकर, रुपेश म्हात्रे, चारफाटा अध्यक्ष रफिक शेख, शैलेश आमुलके, हंसराज चव्हाण, शंकर म्हात्रे आदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने