सानिका सुभाष मुंढे दहावी मध्ये ८८.४० टक्के, ,टी.एन.एम.पब्लिक स्कुल आसरोटी येथे प्रथम

सानिका सुभाष मुंढे दहावी मध्ये ८८.४० टक्के, ,टी.एन.एम.पब्लिक स्कुल आसरोटी येथे प्रथम 

काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : ४ जून ,
                कै.ताराबाई नारायण मुंढे,शैक्षणिक व सामाजिक संस्था,संचालित टी.एन.एम.पब्लिक स्कुल ( इंग्रजी माध्यम )आसरोटी या शाळेचा प्रथमच वर्ष असून शंभर टक्के निकाल लागला आहे. या परिक्षेस १९ विद्यार्थी परिक्षा देण्यासाठी बसले होते.आणी सर्वच विद्यार्थी उत्तम गुणांनी यशस्वी झाले आहे.सानिका सुभाष मुंढे ८८.४० टक्के, प्राप्त करुन प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. या शाळेमध्ये शैक्षणिक शिवाय विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास व्हावा, या उद्दात विचारांतून या ठिकाणी विविध उपक्रम साजरे करण्यात येत असतात.                 तर द्वितीय क्रमांक हर्ष संजय जाधव ८४.२० % तृतीय क्रमांक,अनिकेत नागेंद्र प्रसाद ८०. ०० %,हर्षल संजय जाधव ७७ .८० %,मयुरी कैलास सुपेकर ७६.२० % अदि विद्यार्थ्यांना अनेक गुणांनी उत्तीर्ण झाले आहे.या शाळेचा निकाल १००% लागला असून सर्वच विद्यार्थी बहुसंख्येने मार्क प्राप्त केल्यामुळे शाळेय व्य्वस्थापक,आणी पालक वर्गांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा                   यावेळी अध्यक्ष : संतोष नारायण मुंढे ,उपाध्यक्ष : सुभाष मुंढे, सचिव - कृष्णा गोरे ,खजिनदार - रेश्मा भोईर,सदस्य - हेमंत मुंढे,शंकर ठोंबरे,किरण पाटील अदि शाळेय कमिटी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलेतसेच या शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री म्हात्रे यांचे मोलाचे योगदान व विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन यामुळे विद्यार्थी अधिक गुणांनी यशस्वी झाले असून सर्व विद्यार्थ्यांस पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


थोडे नवीन जरा जुने