उरण दि 21(विठ्ठल ममताबादे ) जागतिक कीर्तीचे आपत्ती व्यवस्थापन तज्ञ रायगड भूषण जयपाल पाटील यांचे 500 व्या व्याख्यानाकडे वाटचाल करीत असताना मार्गदर्शनपर कार्यक्रम नगराज शेठ इंटरनॅशनल स्कूल बोरी उरण येथे संपन्न झाला.रायगड भूषण जयपाल पाटील यांच्या हस्ते गणेश पूजन करून दीप प्रज्वलन केले तर शाळा समिती व्यवस्थापक प्रदीप पाटील यांच्या हस्ते साईबाबांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण केली.
यावेळी त्यांच्यासोबत शाळेच्या दोन्ही विभागाच्या प्रिन्सिपल इशिका मॅडम, ज्योती म्हात्रे उपस्थित होत्या. सुरवातीस जयपाल पाटील यांचे पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन प्रिन्सिपल इशिका मॅडम यांनी स्वागत केले तर त्यांची ओळख प्रदीप पाटील यांनी करून दिली.
या 499 व्या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचा लाभ शाळेतील 50 विद्यार्थी व उपस्थित पालक वर्ग कर्मचारी वर्गांनी घेतला या कार्यक्रमात मुलांना रस्ता ओलांडताना घेण्याची काळजी आपल्या खिशात व दत्तरात कायम आई-वडिलांचा मोबाईल क्रमांक ची चिट्ठी ठेवावी, यामुळे गर्दीच्या ठिकाणी हरविल्यास पोलीस दलाला उपयोग होईल,
अनोळखी माणसाकडून चॉकलेट अगर खाऊ घेऊ नये, घरातील विजेच्या बटनांशी खेळू नये, घरात आई-वडील नसताना अनोळखी माणसासाठी दरवाजा उघडू नये त्यांना नंतर या असे आतूनच सांगावे, शक्यतो आईने घरी केलेलाच खाऊ खावा आपल्या घराशेजारील रिकाम्या जागेत एक तरी स्वतः झाड लावावे घरातील पाण्याचे नळ पूर्णपणे बंद करावे सूचना व प्रात्यक्षिक दाखविले.यावेळी जयपाल पाटील यांनी मुलांना खाऊ रुपये त्यांची बालकविता लाडू हे सादरीकरण केले सर्व मुलांनी टाळ्यांच्या गजरात कवितेला उस्फूर्त प्रतिसाद दिला.या नियोजनबद्ध कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका मॅडम हिने केले तर आभार प्रदर्शन ज्योती म्हात्रे यांनी मानले.
Tags
उरण