कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी घेतली जेएनपीएच्या सेक्रेटरी मनीषा जाधव यांची भेट.







कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी घेतली जेएनपीएच्या सेक्रेटरी मनीषा जाधव यांची भेट.


प्रकल्पग्रस्त व स्थानिक भूमीपुत्रांना नोकरीत सामावून घेण्याची महेंद्र घरत यांची मागणी


बैठकीत सकारात्मक प्रतिसाद.





प्रकल्पग्रस्त व स्थानिक भूमीपुत्रांना नोक-यांमध्ये प्राधान्य देणार असल्याचे मनिषा जाधव यांचे महेंद्र घरत यांना आश्वासन.

उरण दि. 9( विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यात अनेक विविध राष्ट्रीय प्रकल्प आहेत, कंपन्या आहेत, गोडावून आहेत.मात्र तेथे प्रकल्पग्रस्त व स्थानिक भूमीपुत्रांना नोकरीत न घेता , स्थानिक भूमीपुत्र,प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य न देता परप्रांतीयांची भरती केली जाते.त्यामुळे उरण मधील स्थानिक भूमीपुत्र प्रकल्पग्रस्त बेरोजगार होतात बेरोजगारीमूळे कुटुंबांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात.




विविध संकटाना, समस्यांना त्या कुटुंबाला सामोरे जावे लागते.त्यामुळे नेमकी हीच समस्या लक्षात घेउन स्थानीक भूमीपुत्र व प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याच्या उद्देशाने व स्थानिक भूमीपुत्र व प्रकल्पग्रस्तांना नोकरीत प्राधान्य देण्यात यावे या मागणीसाठी कामगार नेते तथा काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी गुरुवार दि 8 जून 2023 रोजी जेएनपीए प्रशासनाच्या ऍडम कार्यालयात जेएनपीएच्या नवनियुक्त सेक्रेटरी व वरिष्ठ प्रबंधक मनिषा जाधव यांची भेट घेतली.



 विविध समस्यावर व नोकऱ्या संदर्भात महेंद्र घरत यांनी चर्चा करून स्थानीक भूमीपुत्र व प्रकल्पग्रस्तांना नोकरीत प्राधान्य देण्याची विनंती केली. या वेळी मनिषा जाधव यांनी महेंद्र घरत व त्यांच्या शिष्ट मंडळाला सकारात्मक प्रतिसाद देत स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्तांनाच नोकरीत प्राधान्य देणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी सेक्रेटरी पदी मनीषा जाधव यांची निवड झाल्याने काँग्रेस पक्षा तर्फे त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला



.यावेळी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर,जेएनपीएचे विश्वस्त रविंद्र पाटील,मार्तंड नाखवा, किरिट पाटील, कमलाकर घरत, रेखाताई घरत, निर्मला पाटील, एकनाथ घरत,जयवंत पाटील,संजय ठाकूर, प्रेमनाथ ठाकूर, भालचंद्र घरत, रोहित घरत, लंकेश ठाकूर,हितेन घरत, अब्दुल शिलोत्री,विनोद पाटील,आदित्य घरत आदी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने