देवद पनवेल येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न व मोफत वह्या वाटप





देवद पनवेल येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न व मोफत वह्या वाटप

पनवेल प्रतिनिधी १०वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कार्यक्रम आयोजित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे देवद शाखेतील उपविभाग प्रमुख श्री.जयंत पाखरे,विभागप्रमुख श्री विशाल भोईर यांच्या संकल्पनेतून रविवार २५ जून,२०२३ रोजी १० वी मध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता 


शिवसेनेचे मा.डाॅ.श्री आशिष बांदेकर, भाटिया शाळेतील शिक्षक मा.श्री.आश्विन अहीरे, व मा.श्री रविंद्र पवार यांच्या हस्ते दिप प्रज्वलन सरस्वती पूजन तुळजा भवानीला व छत्रपती शिवाजी महाजांना हार अर्पण करून करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मा.डॉ.श्री.आशिष बांदेकर बांठीया शाळेतील शिक्षक मा.श्री आश्विन अहिरे, शिक्षक मा. श्री रविंद्र पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.सर्व विद्यार्थ्यांना शिवसेना विभाग प्रमुख श्री. विशाल भोईर, उपविभाग प्रमुख श्री.जयंत पाखरे, शाखाप्रमुख श्रीकांत सरलेकर,उप शाखाप्रमुख दिपक दळवी, गट प्रमुख भिकाजी चव्हाण जयवंत खुजे, राजेश वायरे,तसेच देवद युवासेनेचे सुमित कदम,सुरेश माने, सिध्देश चव्हाण यांच्याही हस्ते सर्व विद्यार्थ्यांना शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात
आले.



 प्रथम क्रमांक.कु. सई मोहिते (८६.२०% गुण) व्दितीय क्रमांक,
कु.अथर्व मोहिते (८३.६०%गुण),
तृतीय क्रमांक कु. चिन्मय साऊल(८३.३०%गुण)यांना
मान्यवरांच्या हस्ते प्रथम, द्वितीय, तृतीय गुणवंत विद्यार्थ्यांना मानधन व सन्मानचिन्ह गुणवंत विद्यार्थ्यांना मानधन शाल सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला तालुका प्रमुख मा.श्री. ज्ञानेश्वर बडे, मा.श्री.संदिप तांडेल, मा.श्री.अजय गोयजी शहर प्रमुख, श्री.बिपिन झुरे,सुकापूर शाखाप्रमुख श्री. हनुमंत खंडागळे महिला संघटनेचे सौ.तनुजा झुरे, सौ.शारदा पाटील यांची कार्यक्रमाला उपस्थिती लाभली




. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित ८० विद्यार्थी मुलांना मोफत वह्या वाटप करण्यात आले. सूत्रसंचलन श्री हेमंत म्हात्रे यांनी केले. सर्व उपस्थित पालकांचे,
मान्यवरांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता श्री.हेमंत म्हात्रे श्री.नंदकिशोर मांजरेकर यांनी राज्य गीत गाऊन करण्यात आली. 



कार्यक्रमाचे मुख्य आयोजक शिवसेना युवासेना शाखा देवद शिवसेना युवासेना श्री सिध्देश चव्हाण, श्री सुमित कदम,योगेंद्र यादव,प्रभाकर कुळये, संजय घाणेकर, उदय चव्हाण, विनोद मोरे,ज्ञानेश्वर गोरे,अनंता लंबाडे,
जयवंत खुजे,मनोहर कदम यांचे ही खूप मोलाचे सहकार्य होते


थोडे नवीन जरा जुने