जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील रक्तदात्यांचा होणार सन्मान.जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील रक्तदात्यांचा होणार सन्मान.
रक्तदात्यांना आदर्श रक्तदाता रायगड हे ई सन्मानपत्र देवून गौरविण्यात येणार.
उरण दि १२(विठ्ठल ममताबादे )
जागतिक आरोग्य संघटना ( WHO ) द्वारे दरवर्षी १४ जून हा जागतिक रक्तदाता दिन साजरा करण्यात येतो. महान शास्त्रज्ञ कार्ल लँडस्टीन यांचा जन्मदिन. त्यांनी मानवी रक्तात एग्ल्यूटिनिनच्या अस्तित्वाच्या आधारे रक्ताचे ए बी आणि ओ असे वेगवेगळ्या गटात वर्गिकरण केले. ह्या महत्वाच्या वैद्यकीय शोधासाठी त्यांना १९३० साली नोबेल पूरस्काराने सन्मानीत करण्यात आले.


जागतिक रक्तदाता दिनाचे महत्व सुरक्षित रक्त आणि रक्त उत्पादनांच्या गरजेबद्दल जागतिक जागरूता वाढविणे आहे. हा दिवस ऐच्छिक, न चुकता रक्तदान करणाऱ्याचे आभार मानण्याचा दिवस. आणि ह्याच उद्देशाने युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार पुरस्कृत नेहरू युवा केंद्र अलिबाग, महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पाणदिवे आणि वटवृक्ष सामाजिक संस्था उलवे यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील ज्या ज्या रक्तदात्यांनी रुग्णसेवेसाठी रक्तदान केले आहे त्या त्या रक्तदात्यांना आदर्श रक्तदाता रायगड हे ई सन्मानपत्र देवून गौरविण्यात येणार आहे.

१४ जून २०२२ ते १४ जून २०२३ ह्या कालावधीत रक्तदात्यांनी रक्तदान केल्याचे प्रमाणपत्र अथवा फोटो आणि पूर्ण नाव 9870955505 ह्या व्हॉटस्अप क्रमांकावर १६ जून पर्यंत नोंदणी करायची आहे असे रायगड भूषण मनोज पाटील यांनी सुचित केले आहे. वैद्यकीय शस्त्रक्रीया तसेच ज्यांच जीवन एखाद्या गंभीर आजारामुळे धोक्यात आहे. त्यांना योग्यवेळी रक्त उपलब्ध झाल्यास त्यांचे जीव वाचू शकतो. भारतात रक्तामुळे दरवर्षी लाखो जीव वाचण्यास मदत होते. हे रक्तदात्यांमुळेच आणि म्हणूनच ह्या महान कार्यास प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही एक उपक्रम राबवीत आहोत असे याप्रसंगी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक निशांत रौतेला यांनी मत व्यक्त करून सर्व रक्तदात्यांचे व रक्तदान शिबीर आयोजन करणाऱ्या मान्यवरांचे आभार मानून शुभेच्छा दिल्या.

थोडे नवीन जरा जुने