स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत वहया वाटप







स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत वहया वाटप
पनवेल दि.२३ (संजय कदम) : स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांच्या वतीने राजिप प्राथमिक शाळा वडघर येथे मोफत वहया वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज संसारे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 



 या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर रवी वैष्णव, उद्योगपती राहुल पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत कांबळे, उपाध्यक्ष सोनाली महेश साळुंखे, मुमताज पठाण, समाधान कांबळे, अरूण कांबळे, मनोज कांबळे, दिलीप नाईक, महाड येथील अमिन लोगडे, पेण येथील उद्योजक मयुरशेठ वनगे, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक जयदास घरत, सर्व शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज संसारे यांचे नुकतेच निधन झाले आहे.



 याकार्यक्रमानिमित्त मनोज संसारे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी महेश साळुंखे यांनी सांगितले कि, मनोज संसारे यांनी मुंबईतील झोपडपट्टीतील जनतेचे प्रश्न, महाराष्ट्रातील दिन दलितांच्या उद्धारासाठी त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक वर्षे घालवली. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना मानणारे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या अकाली निधनाने आंबेडकरी चळवळीची अपरीमीत हानी झाली आहे



. गेली तीस वर्षे ते आंबेडकरी चळवळ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अहोरात्र मेहनत करत होते. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन अनिकेत संसारे, सागर संसारे, सुमीत संसारे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना मागणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी तयार करून आगामी येणाऱ्या निवडणुकीत पक्षाच्या वतीने लढणार असल्याचे सांगितले. 


थोडे नवीन जरा जुने