जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल, आवरे शाळेचा दहावीचा निकाल १००%
जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल, आवरे शाळेचा दहावीचा निकाल १००%


उरण दि ६(विठ्ठल ममताबादे )
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या वर्षी १० वी एस.एस.सी बोर्ड परीक्षा घेण्यात आली या परीक्षेत जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल, आवरे ता. उरण जि. रायगड या इंग्रजी माध्यमाचे १८ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते १० वी एस. एस. सी बोर्डचा निकाल दि. ०१/०६/२०२३ रोजी जाहिर करण्यात आला
 यामध्ये ठाकूर हायस्कूल च्या चौथ्या बॅचेसच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ गुण मिळवून यश संपादन केले आहे ठाकूर हायस्कूलच्या शाळेच्या चौथ्या बॅचेसचा निकाल १००% लागला आहे.

यामध्ये प्रथम क्रमांक देवांग नरेंद्र वर्तक ८८.२०% द्वितीय क्रमांक नियती नरेंद्र गावंड ८४.६०% तृतीय क्रमांक समेक्षा शिवदास वर्तक ८४.२०% असे एकूण ८ विद्यार्थी ७५ च्या पुढे आहेत. याबद्दल आत्माराम ठाकूर मिशन चे संस्थापक व अध्यक्ष अशोक ठाकूर, खजिंदार, वामन ठाकूर, सचिव अलका ठाकूर, विश्वस्त सिंदू ठाकूर व प्रसाद ठाकूर मुख्याध्यापिका कांचन थळी व शिक्षक पालक संघाचे उपाअध्यक्षा विशाखा गावंड व सदस्य यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व मागदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. सलग चौथ्या वर्षी १००% निकाल लागल्या बद्दल पंच क्रोषीतील पालक व ग्रामस्थांनी या यशा बद्दल अभिनंदन केले आहे.


थोडे नवीन जरा जुने