रुस्तमजी केरावाला फाउंडेशन जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालय शेवा येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा.


रुस्तमजी केरावाला फाउंडेशन जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालय शेवा येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा.

उरण दि. 21 (विठ्ठल ममताबादे) 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून भारतासह देश विदेशात साजरा केला जातो. उरण तालुक्यातील रुस्तमजी केरावाला फांउडेशन जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालय शेवा या विदयालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
योग दिना निमित्त योग शिक्षक मनोहर टेमकर आणि पर्यवेक्षक शशिकांत म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्व पटवून सांगत विद्यार्थ्याना योगाचे विविध प्रकार शिकविले. विद्यार्थ्यांनी उत्साही मनाने सहभागी होत योगा केला. योग गुरु भरत मढवी यांच्या मार्गदर्शनाखाली मल्टीपर्पज हॉल येथे सकाळी 6 ते 8 या कालावधीमध्ये शाळेतील सर्व शिक्षकांनी योगाचे प्रात्यक्षिक केले.या प्रसंगी शाळेमध्ये इयत्ता 10 वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विदयार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला श्रीमती मनीषा जाधव सेक्रेटरी जे.एन.पी.ए या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
 यावेळी रविंद्र इंदुलकर व्हाईस प्रेसिडेंट आर.के.एफ.,श्रीमती पूजा अंजनिकर प्रशासकीय अधिकारी जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालय शेवा, रमाकांत गावंड मुख्याध्यापक प्राथमिक गिरीश पाटील मुख्याध्यापक माध्यमिक मराठी माध्यम, प्रमोद कांबळे मुख्याध्यापक माध्यमिक इंग्रजी माध्यम, पर्यवेक्षक जगदीश मढवी आणि पर्यवेक्षिका श्रीमती सुजा शिवरामन आदी मान्यवर उपस्थित होते. माध्यमिक मराठी माध्यमच्या इयत्ता 10 वी मध्ये हर्ष नितीन शेळके(94.80% गुण प्राप्त) याने शाळेत आणि उरण तालुक्यात मराठी माध्यमातून प्रथम येण्याचा मान मिळविला. तसेच रुद्र मिलिंद पाटील द्वितीय(92.60% गुण), साक्षी जयेंद्र भोईर तृतीय (91.00% गुण)तसेच इंग्रजी माध्यमांमध्ये प्रथम क्रमांक दक्ष दिपक रसाळ (93.80% गुण), द्वितीय रिद्धी भास्कर म्हात्रे (93. 60% गुण), तृतीय श्रेया भावेश तांडेल (93.00% ) या विद्यार्थ्यांना तुळशीचे रोपटे व भेटवस्तू देऊन जे.एन.पी. ए च्या सेक्रेटरी श्रीमती मनिषा जाधव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या यशात त्यांच्या आईवडिलांचेही महत्वाचे योगदान असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांचा म्हणजेच आई वडिलांचाही यावेळी सत्कार करण्यात आला . आपल्या मनोगतात श्रीमती मनिषा जाधव यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शाळेच्या संपूर्ण टिमचे कौतुक केले. शाळेने चांगली प्रगती साधली असून शाळेचे नाव असेच उत्तरोतर उंच जावो अशी सदिच्छा व्यक्त करत शाळेला कोणतीही मदत लागल्यास आपण नेहमी सहकार्य करू व शाळेच्या पाठीशी ठामपणे उभे राहू असे आश्वासन दिले.सदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात,उत्तम प्रतिसादासह संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, कर्मचारी वृंदानी विशेष मेहनत घेतली.


थोडे नवीन जरा जुने