शिवसेना पनवेल जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; सकडो जणांनी केला शिवसेनेत पक्ष प्रवेश


शिवसेना पनवेल जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; सकडो जणांनी केला शिवसेनेत पक्ष प्रवेश
पनवेल दि.०३(वार्ताहर): शिवसेना पनवेल जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत मोठ्या उत्साहात साजरा झाला. रामदास शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त ०१ जून रोजी परमशांतीधाम वृद्धाश्रम तलोजा या ठिकाणी फळ व चादरी वाटप करण्यात आले. लाडू तुला करून या लाडू चे वाटप करण्यात आले तसेच कळंबोलीत आरोग्य शिबीर ही ठेवण्यात आले होते.
     शिवसेना पनवेल जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी वाढदिवशी कार्यकर्त्यांना आवाहन केले होते की, हारतुरे पुष्पगुच्छ न आनता शैक्षणिक साहित्य भेट द्या. त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांनी दोन टन वह्या जमा करून वही तुला करण्यात आली. या वह्या परिसरातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वाटण्यात येणार आहेत. रामदास शेवाळे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे औचित्यसाधून शेकडो महिला आणि तरुणांनी हाती शिवबंधन बांधले. यावेळी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने