पनवेल दि.२६ (संजय कदम) : पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले विकास साळवी यांनी मुंबई विद्यापीठाच्या एलएलएम परीक्षेत यश प्राप्त केले असून त्यांनी महाराष्ट्रातून पाचवा क्रमांक पटकावला आहे. त्यानिमित्त त्यांचे मित्रपरिवार यांनी पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन त्यांचे अभिनंदन केले.
नवी मुंबई पोलीस दला अंतर्गत असलेल्या पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले विकास साळवी यांनी आपले कर्तव्य बजावत असताना पुढे शिक्षणाचे ध्येय जपले. त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या एलएलएम अर्थात वकिलीचे शिक्षण पूर्ण केले.
Tags
पनवेल