सकल मराठा समाज खांदा कॉलनी च्या वतीने ‘पालक-विद्यार्थी’ गुणगौरव सोहळा संपन्न






सकल मराठा समाज खांदा कॉलनी च्या वतीने ‘पालक-विद्यार्थी’ गुणगौरव सोहळा संपन्न


पनवेल दि.२६ (संजय कदम) : सकल मराठा समाज खांदा कॉलनी च्या वतीने ‘पालक-विद्यार्थी’ गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी त्यांच्यावर परिश्रम करणाऱ्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच यानिमित्त गुरुमंत्र यशाचा विशेष शैक्षणिक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

 सकल मराठा समाज खांदा कॉलनी च्या वतीने ‘पालक-विद्यार्थी’ गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये २०२२-२३ या शैक्षणिक वर्षांमध्ये उत्तम गुण मिळवून दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी त्यांच्यावर परिश्रम करणाऱ्या पालकांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन सकल मराठा समाज खांदा कॉलनीच्या वतीने खांदा कॉलनी येथील मराठा समाज संपर्क कार्यालय येथे करण्यात आले होते.


 यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. तसेच या निमित्ताने ‘गुरुमंत्र यशाचा’ विशेष शैक्षणिक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वर्धिष्णू फाउंडेशनचे गिरीश चव्हाण प्रमुख वक्ते उपस्थित होते. त्यांनी उपस्थित विद्यार्थी व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास मराठा समाज बांधव, विद्यार्थी, पालक व नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




थोडे नवीन जरा जुने