पनवेल दि.२६ (संजय कदम) : मा. अन्न मंत्रालय सल्लागार समिती सदस्य तसेच राष्ट्रीय किसान संघटना महाराष्ट्र प्रदेश मंत्री नरेशशेठ भोईर यांनी आपला वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत लहान मुलांच्या निवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना जिवनाश्यक वस्तुचे वाटप करून साजरा केला.
नरेश शेठ भोईर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त चिरनेर येथे स्वामी समर्थ ट्रस्ट च्या संचालित लहान मुलांच्या निवासी आश्रमशाळेत जावुन सर्व विद्याथ्यांना जिवनाश्यक वस्तुचे वाटप केले. यावेळी संदिप पाटील मित्र परिवार नवी मुंबई चे सदस्य संदीपभाऊ पाटील
, संजय पवार, दीपक पाटील, सुनील कुरकुटे, विजय चव्हाण, दिनेश ठाकूर, मयूर चिपलेकर, राकेश कडू, अक्षय पाटील, अमित खारकर, विनायक थोत्रे, अक्षय काळे, ऋषीकेश ओवलेकर, प्रशांत कारंडे, रोहित खंडागळे, कुंदन म्हात्रे, शरद म्हात्रे, उमेश टोके, विश्वास शिंदे व त्यांचा मित्रपरिवार उपस्थित होता.
Tags
पनवेल