मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवत खारघरमध्ये अनेकांचा शिवसेनेचे प्रवेश


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवत खारघरमध्ये अनेकांचा शिवसेनेचे प्रवेश   
पनवेल दि.२६ (संजय कदम) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवत रायगडसह संपूर्ण राज्यातुन लोक शिवसेना पक्षात दाखल होत आहेत. त्याअंतर्गत शिवसेना खारघर शहर प्रमुख प्रसाद परब यांच्या नेतृत्वाखाली विश्व हिंदू परिषदचे माजी शहराध्यक्ष विजय दौलतानी, मोहित दौलतानी, राकेश डोंगरे तसेच मनसे खारघर महिला शहर सचिव रिद्धी केणी ,मनसे महिला विभाग अध्यक्ष नम्रता सुभेदार, मनसे महिला शाखा अध्यक्ष उषा चिटीयाल, मनसे कार्यकर्ता कीर्ती पवार यांच्यासह कळंबोली मधील शेकडो व्यावसायिकांनी शिवसेना पनवेल महानगर जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात वेगाने करत असलेल्या विकासकामांमुळे प्रेरित होऊन राज्यभरातून विविध पक्षाचे हजारो कार्यकर्ते शिवसेनेत येत आहेत. त्याअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवत आणि शिवसेना खारघर शहर प्रमुख प्रसाद परब यांच्या नेतृत्वाखाली विश्व हिंदू परिषदचे माजी शहराध्यक्ष विजय दौलतानी, मोहित दौलतानी, राकेश डोंगरे तसेच मनसे खारघर महिला शहर सचिव रिद्धी केणी ,मनसे महिला विभाग अध्यक्ष नम्रता सुभेदार, मनसे महिला शाखा अध्यक्ष उषा चिटीयाल, मनसे कार्यकर्ता कीर्ती पवार यांच्यासह कळंबोली मधील शेकडो व्यावसायिकांनी शिवसेना पनवेल महानगर जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी पक्षाची शाल व पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेना कार्यकतें व पदाधिकारी उपस्थित होते. 


थोडे नवीन जरा जुने