पनवेल दि.२०(वार्ताहर): जगातील ३३ देशांनी दखल घेतलेल्या गद्दारीस समर्पित'जागतिक गद्दार दिन आज युवासेनेच्यावतीन खारघर येथे साजरा कऱण्यात आला. यावेळी युवानेच्या कार्यकर्त्यांनी ५० खोके एकदम ओकेच्या घोषणा देत मिंधे गटाचा निषेध केला.
खारघर युवासेना मध्यवर्ती कार्यालयात आज जगातील ३३ देशांनी दखल घेतलेल्या गद्दारीस समर्पित 'जागतिक गद्दार दिन'युवासेना रायगड उपजिल्हा अधिकारी अवचित राऊत यांच्या नेतृत्वाखाली विशेष खोके उपक्रमांनी जल्लोषात साजरा केला.
यावेळी प्रभाग अधिकारी निखील पानमंद, उपप्रभाग अधिकारी सागर जाधव, शाखाअधिकारी योगेश महाले, अश्वीन ससाने , राजेश लवंड , सत्यपाल पवार , कल्पेश पवार आदी युवासैनिक ऊपस्थीत होते. यावेळी युवासैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत मिंधे गटाचा निषेध केला.
Tags
पनवेल