खांदा कॉलनीत संयुक्त मोर्चा संमेलन; मंत्री रवींद्र चव्हाण यांची उपस्थितीखांदा कॉलनीत संयुक्त मोर्चा संमेलन; मंत्री रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती

खांदा कॉलनी(प्रतिनिधी) देशाचे कार्यकुशल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात देश विकासाची मोठी पावले उचलतानाच जागतिक स्तरावर भारताची मन उंचाविण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले आहे. त्यानुषंगाने योजना, विकास कामे, निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपतर्फे मोदी @ 9 महाजनसंपर्क अभियानाअंतर्गत रविवारी (दि. 25) संयुक्त मोर्चा संमेलन आयोजित करण्यात आला होता. खांदा कॉलनी येथील बेलिझा बँक्वेट हॉल येथे सार्वजनिक बांधकाम, अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाला.


या वेळी भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, 


दीपक बेहेरा, माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार, अल्प संख्यांक मोर्चा अध्यक्ष सय्यद अकबर, माजी उपमहापौर सीताताई पाटील, माजी नगरसेविका चारुशीला घरत, नीता माळी, वृषाली वाघमारे, मोनिका महानवर, चारुशीला घरत, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, विकास घरत, मनोहर म्हात्रे, समीर ठाकूर, मुकीत काझी, कामोठे महिला मोर्चा शहर अध्यक्ष वनिता पाटील, विद्याताई तामखेडे, भीमराव पोवार, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.


दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते विष्णू गायकवाड यांनी भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष प्रवेश केला आहे. या वेळी सार्वजनिक बांधकाम, अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विष्णू गायकवाड यांना पक्षाची शाल देऊन स्वागत केले.थोडे नवीन जरा जुने