मंगळवारी गव्हाण विभागात मोफत वह्या वाटप कार्यक्रम


मंगळवारी गव्हाण विभागात मोफत वह्या वाटप कार्यक्रम 

पनवेल(प्रतिनिधी) सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य क्षेत्रात गेली तीन दशके उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भाजप उलवे नोड २ यांच्या संयुक्त विद्यमाने गव्हाण विभागातील गरजू विद्यार्थ्यांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते मोफत वह्या वाटप करण्यात येणार आहे.         मंगळवार दिनांक २७ जून रोजी सकाळी १०. ३० वाजता न्हावा राजिप शाळा, सकाळी ११ वाजता न्हावा खाडी राजिप शाळा, सकाळी ११. ३० वाजता शिवाजीनगर राजिप शाळा, दुपारी १२ वाजता कोपर राजिप शाळा, दुपारी १. ३० वाजता श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन भगत ज्युनिअर महाविद्यालय गव्हाण कोपर येथे, दुपारी ०३ वाजता शेलघर राजिप शाळा, दुपारी ०३. ३० वाजता कन्या शाळा व गव्हाण राजिप शाळा, सायंकाळी ०४ वाजता बेलपाडा राजिप शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे. यावेळी पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 


         

थोडे नवीन जरा जुने