डोक्यावर तुळस, मुखात हरिनाम,मस्तकी पांडुरंगाचा बुका, विद्यार्थी झाले वारकरी
काशिनाथ जाधव : प्रतिनिधीपाताळगंगा : २९ जून,
आषाढी एकादशी निमित्ताने विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक भक्त आणी वारकरी जात असतात. मात्र या विद्यार्थ्यांना या पंढरपूर येथे जाता आले नसले तरी सुद्धा या ठिकाणी वारकरी यांची वेष भुषा करुन आम्ही वारकरी झालो. असे विमलाताई पारनेरकर विद्यालय वाशिवली येथिल सेमी इंग्लिश स्कुल च्या विद्यार्थ्यांनी पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शिक्षक वर्गांनी मोठ्याप्रमाणावर सहभाग नोंदविला.
यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेपासून ते वाशिवली येथिल असलेल्या विठ्ठल रखुमाई मंदिर येथे पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.मुलींने डोक्यावर तुळस नववारी साडी नेसून तर मुलाने मस्तकावर बुक्का,अबीर,धोतर पांढरी टोपी,गळ्यात टाळ मृदंग घालून वारकरी वेष परिधान केल्यांचे पहावयास मिळाले मुखात हरीनाम आणी विठ्ठलाचा गजर करीत ही पायी दिंडी काढण्यात आली यावेळी त्यांच्याकडे पहातांना मुले जणू वारकरी झाली असून ते पंढरपूर ला जात आहे की काय असा भास येथिल ग्रामस्थ आणी प्रवासी वर्गांना भासत होते.
आम्ही पंढरपूरला जाऊ शकलो नसलो तरी त्याच्या या नामच्या उच्चाराने आणि वारकरी सारखी दिंडी काढून मनाला एक प्रकारचे समाधान या विद्यार्थाना मिळत आहे.असे मत दिंडी आयोजक विमलाताई पारनेरकर सेमी इंग्लिश प्राथमिक विद्यामंदिर वाशिवली चे संस्थाध्यक्ष तुळशीदास पाटील यांनी व्यक्त केले.यावेळी मुख्याध्यापिका – मीनाक्षी रणदिवे, सहशिक्षक कल्पना गव्हाणे,लहु वारगुडे सर, संजीवनी म्हात्रे या शिक्षकांनी पहिली ते चौथी पायी दिंडी चे आयोजन केले होते.
Tags
पाताळगंगा