वसुंधरा फाउंडेशन आणि नाच गं घुमा यांच्यावतीने ठेवा संस्कृतीचा अंतर्गत आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन





वसुंधरा फाउंडेशन आणि नाच गं घुमा यांच्यावतीने 'ठेवा संस्कृतीचा 'अंतर्गत आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन
पनवेल दि.२९(वार्ताहर): विठुरायाच्या गजरात अवघी बाळ गोपाळांची पंढरी पनवेल मध्ये अवतरली असून वरुण राजाच्या साक्षीनं टाळ मृदंगाच्या तालावर मुलांनी वारीचा अनुभव पानवेलकरांनी घेतला. पनवेल मधील वसुंधरा फाउंडेशन आणि नाच गं घुमा यांच्यावतीने 'ठेवा संस्कृतीचा 'अंतर्गत आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन केले होते. छोटे विठोबा रखुमाई ,पालखी अब्दागिरे ,झेंडे ,मानाचा दंड आणि छोट्या वारकऱ्यांची मांदियाळी सर्वांचे आकर्षण बनले होते. या दिंडीला भापजचे रायगड जिलाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत चिमुकल्यांचे कौतुक केले.



   सावरकर चौकातील रामेश्वर मंदिरामधून बाळ गोपाळांच्या दिंडीला सुरुवात झाली. गजराच्या तालावर दिंडी लोखंडी पाडा मार्गे वडाळा तलाव येथे आल्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी नगरसेवक तथा जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांनी दिंडीचे स्वागत केले आणि पालखीचे दर्शन घेतले. यावेळी सोशल मीडिया शहर संयोजक प्रसाद हनुमंते, रुपेश नागवेकर, महेश सरदेसाई, केतन खुटले, प्रसाद कंधारे, नरेंद्र सोनवणे, विनीत मढवी, रवी संदेपाल उपस्थित होते. 



गजराचा ताल आणि वारकरी पाऊली सोबत पखवाज यामुळे सगळे वातावरण भक्तीमय झाले होते. समृद्धीचे आणि एकतेचे प्रतीक असलेल्या वारीची परंपरा बाळगोपाळ पुढे नेत आहेत याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी कौतुक करून आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा दिल्या. या दिंडीचे आयोजन सुनिता खरे ,अपर्णा नाडगौंडी, अमिता मस्कर , विनिता शेटे , कीर्ती जोशी आदिती बेलोसे ,प्रीती देसाई ,लीना भोंगे, गौरी चितळे यांनी केले होते.

 

थोडे नवीन जरा जुने