रोटरी क्लब ऑफ पनवेलनी बांधुन दिली नवीन विज्ञान प्रयोग शाळा

रोटरी क्लब ऑफ पनवेलनी बांधुन दिली नवीन विज्ञान प्रयोग शाळा
पनवेल दि.२० (संजय कदम) : रोटरी क्लब ऑफ पनवेलने तालुक्यातील भाताण येथे असलेल्या भाताण माध्यमिक विद्यालय यांना नवीन विज्ञान प्रयोग शाळा बांधुन दिली. या प्रयोग शाळेचे उदघाटन रोटरीचे प्रांतपाल डॉ.अनिल पालमार यांच्या हस्ते झाले.


             सदर कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ पनवेलचे अध्यक्ष रो.शिरीष नांदेडकर, सचिव श्रीकृष्ण पाटील, सेवा डायरेक्टर राजन म्हात्रे व इतर रोटरी सदस्य उपस्थित होते. आठ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या प्रयोग शाळेचा लाभ दर वर्षी २०० विद्यार्थ्यांना घेता येईल


. यावेळी मुख्याध्यापक श्री मोकल यांनी पाहुण्यांना शाळेची माहिती देऊन प्रयोग शाळेच्या बांधणीबद्दल रोटरीचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रो. श्याम जहांगीरदार व रो.प्रसाद दीक्षित यांनी केले 


थोडे नवीन जरा जुने