आर्मेचर ज्युडो असोसिएशनचा प्रशिक्षण शिबीर संपन्न.
आर्मेचर ज्युडो असोसिएशनचा प्रशिक्षण शिबीर संपन्न.
उरण दि 20(विठ्ठल ममताबादे )रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उलवे नोड येथे रायगड आर्मीच्या जुडो असोसिएशनचे शिबिर आयोजित करण्यात आले होते.संस्थेचे अध्यक्ष रवींद्र भगत यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले


.या शिबिराला मुंबईहून व्हिडिओ असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील, उपाध्यक्ष प्रदीप कवठे व ब्लॅक बेल्ट संपदा संपदा फालके,ओंकार घरत यांनी 82 विद्यार्थ्यांना जुडो प्रशिक्षण दिले. रवींद्र भगत यांनी विद्यार्थ्यांना जुडो खेळाबद्दल महत्त्वाची माहिती दिली

.या शिबिरा करिता सचिव राजू कोळी, उपसचिव गोपाळ म्हात्रे, खजिनदार महेंद्र कोळी, शैलेश जाधव, राजेश कोळी, रोहित घरत, अनिश पाटील, परेश पावस्कर, अमिषा घरत, शुभम ठाकूर यांनी शिबिर यशस्वी करण्याकरिता विशेष मेहनत घेतली. या शिबिराचे आयोजन अजिंक्य भगत टेक्निकल डायरेक्टर यांनी केले होते. एकंदरीत आर्मेचर ज्युडो असोसिएशनचा प्रशिक्षण शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.


थोडे नवीन जरा जुने