नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदारसंघातून मंदा म्हात्रे यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली. त्यामुळे नाराज झालेल्या भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी भाजपची साथ सोडली आणि शरद पवार गटात प्रवेश केला आहे.
पण संदीप नाईक यांच्या प्रवेशामुळे शरद पवार गटातील कार्यकर्ते नाराज झाले आहेत. शरद पवार गटाच्या 11 तालुका अध्यक्षांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत त्यांनी राजीनामे दिले आहेत. यात तालुकाध्यक्षांसह अनेक पदाधिकारी आहेत.
Tags
नवी मुंबई