पनवेल (प्रतिनिधी) कर्नाळा बँकेत घोटाळा करून ठेवीदार आणि खातेदारांचे पैसे हडप करणाऱ्या राजाचे राजपण सध्या तळोजा जेलमध्ये सुरु आहे, अशी टीका आमदार प्रशांत ठाकूर यांनी आदई मधील शेकाप कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशावेळी केली. शेतकरी कामगार पक्षाला जोरदार झटका देत आदई ग्रामपंचायतीचे सदस्य आकाश मोकल यांनी त्यांच्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये गुरुवारी जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशाने भारतीय जनता पार्टीची ताकद आणखी वाढली असून शेकापला गळती लागली आहे.
या प्रवेशकर्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन स्वागत केले तसेच तुम्ही जो निर्णय घेतला आहे तो तोग्य असून पक्षात सन्मान दिला जाईल असे आश्वासित केले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या दृष्टीकोनातून होत असलेल्या विकास कामांवर प्रभावित होऊन अनेक पक्षाचे नेते पदाधिकारी भाजपमध्ये सामील होत आहेत. त्यानुसार त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन शेतकरी कामगार पक्षाचे आदई ग्रामपंचायतीचे सदस्य आकाश मोकल, अनिकेत पाटील, प्रशांत मोकल, मुकेश मोकल, गिरीश मोकल, जगदीश मोकल, रुपेश म्हात्रे, रुपेश मोकल, गजानन रसाळ, अतिश शेळके, आर्यन मोकल, हर्ष
कनोजिया अभिमन्यू भंडारी, विनोद म्हात्रे, धीरज जसवाल, प्रकाश खोलपते, माणिकचंद, सतीश सोनवणे, जहीर खान, सुरज राजपूत, मोहम्मद बशीर, सुभाष पटेल, धरवेन्द्रकुमार पटवा, सूर्यनारायण, रमेश सिंह, संतलाल पासी, साहिल भंडारी, मोहम्मद तोफिक, पियुष भंडारी, सुशांत शेळके, सुरज पाटील यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर हा पक्ष प्रवेश झाल्याने त्याला आणखी महत्व प्राप्त झाले
असून ग्रामीण भागात भाजप अधिक मजबूत बनला आहे. खांदा कॉलोनीमध्ये झालेल्या या पक्ष प्रवेशावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, माजी सरपंच महादू शेळके, भाई रमा पाटील, जगदीश शेळके, बाळाराम पाटील, पद्माकर शेळके, श्रीचन भंडारी. राजेश काकडे, जनार्दन पाटील, मंगेश भोपी, निलेश पाटील, राहुल पाटील, रोहित पाटील, विवेक पाटील, ज्ञानेश्वर पाटील, तेजस म्हात्रे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
पनवेल