- लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन


वृत्त प्रसारित झाले आणि बैठकीत विजयी घोषणा देत जल्लोष करण्यात आला. उमेदवारी दिल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्ष नेतृत्वाचे तसेच पदाधिकारी कार्यकर्त्याचे व जनतेचे आभार मानले. भाजपच्या कार्यकर्त्याला संधी मिळते त्याचे उदाहरण आमदार विक्रांत पाटील असल्याचे त्यांनी म्हंटले. आपल्याला कधी काही मिळेल याची अपेक्षा कार्यकर्ता बाळगत नाही तर काम करत राहायचे हा भाजप कार्यकर्त्याचा पिंड आहे. बाळासाहेब पाटील यांनी गेली ४० वर्षे मेहनत आणि जिद्दीने काम केले, 
असे सांगतानाच विक्रांत पाटील यांनी केलेली मेहनत फळाला आली असल्याचे त्यांनी गौरवोद्गार काढले. खारघर टोलमुक्ती करण्याच्या दृष्टिकोनातून आपण भाजपात सहभागी झालो. त्यावेळी देवेंद्रजी यांनी आम्हाला टोल मुक्तीचा शब्द दिला होता आणि तो शब्द त्यांनी पूर्ण करून दिला आणि त्या ऐतिहासिक निर्णयाचा फायदा वाहनचालकांना झाला. त्यानंतर अनेक प्रकल्प, योजना, विकासकामे देवेंद्रजींच्या व महायुतीच्या नेतृत्वामुळे पनवेल क्षेत्रात आली. त्यामुळे यापुढीलही काळात विकासाचा महामेरू चालत राहील, असा विश्वासही आमदार प्रशांत ठाकूर यांनी जनतेला दिला. 
यावेळी प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील यांनी म्हंटले कि, लोकनेते रामशेठ ठाकूर विरोधी पक्षात होते तेव्हा सुद्धा त्यांच्याप्रती कायम आम्हाला आदर होता. आणि तो आदर भाजपात अधिक वृद्धिंगत झाला. कर्णानंतर दानशूर म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर आहेत. तर आमदार प्रशांत ठाकूर संयमी आणि दिलेली वेळ पाळणारे, सामाजिक जाणीव असलेले लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्या पाठीशी सर्वांचे आशीर्वाद असून विजय निश्चित आहे फक्त भरघोस मतांनी जिंकायचे आहे. असेही त्यांनी अधोरेखित करून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आमदार विक्रांत पाटील यांचा झालेला सत्कार राजकीय जीवनातील मोठी अचिव्हमेंट असल्याचेही सांगितले.  
यावेळी आमदार विक्रांत पाटील यांनी आपल्या जीवनातील राजकीय आढावा मांडला  लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी माझा सन्मान केला त्याबद्दल मी भारावून गेलो आहे. बाहेरचे लोकं कौतुक करतात पण जेव्हा घरच्या लोकांकडून कौतुकाची थाप मिळते तेव्हा तो आनंद वेगळाच असतो आणि तो आजच्या सत्काराने मला झाला असून हे माझ्यासाठी अभिमानाचे आहे त्यामुळे मी तुमच्या प्रेमातून कधीही उत्तराई होऊ शकत नाही. लोकनेते रामशेठ ठाकूर हे मार्गदर्शनाचे विद्यापीठ आहे. आपल्या सर्वांचे नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, नामदार रवींद्र चव्हाण, चंद्रकांतदादा पाटील, लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी आहेत. विधायक कार्य, वेळ, पायाला भिंगरी लावून काम करणे अशा अनेक गोष्टी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत. आपला नेता शंभर नंबरी आहे, विरोधक वातावरण दूषित करण्याचे काम करतील पण आपण सर्वानी सजग राहिले पाहिजे. या निवडणुकीत प्रत्येकाने मीच उमेदवार असे समजून काम करा. फक्त विजय नाही तर मतांचा लीड महत्वाचा आहे, असेही त्यांनी म्हंटले. 
         यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी सांगितले कि, विरोधकांकडून अपप्रचार केला जात आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक मंडलात कार्यालय आहे,आणि त्या कार्यालयांच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे तसेच विविध योजना लोकापर्यंत पोहोचवण्याचे काम केले जाते, मात्र विरोधकांकडे कुठलाही मुद्दा नसल्याने ते आता वेगवेगळ्या क्लुप्त्या करत खोटा प्रचार करत आहेत. तसेच लाडकी बहीण किंवा इतर योजना बंद करण्याच्या अफवाही उठवत आहेत. त्या अफवांनाही नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले. 
थोडे नवीन जरा जुने