दिपक पाटील यांची भाजपच्या ओबीसी सेल उरण तालुकाध्यक्ष पदी निवड

दिपक पाटील यांची भाजपच्या ओबीसी सेल उरण तालुकाध्यक्ष पदी निवड

उरण दि. 11 (विठ्ठल ममताबादे) उरण तालुक्यातील कळंबुसरे गावचे रहिवाशी सामाजिक कार्यकतें तथा भारतीय जनता पार्टीचे कट्टर व एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून दिपक पाटील सर्वांना सुपरिचित आहेत.टावूनशिप मल्टीपर्पज हॉल, उरण येथे आयोजित पक्ष प्रवेश सोहळ्या प्रसंगी भारतीय जनता पार्टी तर्फे दिपक पाटील यांची नियुक्ती ओबीसी सेल उरण तालुकाध्यक्ष पदी करण्यात आली आहे.आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या हस्ते त्यांना हे अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी भाजपाचे उरण तालुकाध्यक्ष रवि भोईर, कुलदिप नाईक, उरण पूर्व विभाग सरचिटणीस रुपेश पाटील, कळंबूसरे गाव अध्यक्ष राजेश पाटील, सदस्य मयूर गायकवाड आदी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. पक्षाचे निष्ठावंत, प्रामाणिक व मनमिळावू,दांडगा जनसंपर्क असलेले दिपक पाटील(कळंबूसरे )यांची भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलच्या उरण तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याने त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.माझ्यावर दिलेली जबाबदारी मी एकनिष्टेने, प्रामाणिकपणे पार पाडेन. पक्षाचा तळागाळात प्रचार व प्रसार करेन अशा भावना व्यक्त करत दिपक पाटील यांनी आ. प्रशांत ठाकूर, आ. महेश बालदी व सर्व भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचे आभार मानले आहेत.थोडे नवीन जरा जुने