माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या मातृत्वाला व दातृत्वाचा आणखीन एक प्रत्यय ...

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या मातृत्वाला व दातृत्वाचा आणखीन एक प्रत्यय ...
पुनाडे येथील चैतन्य म्हात्रे यांच्या इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी चौथ्या वर्षीही आर्थिक मदत.उरण दि 17(विठ्ठल ममताबादे )
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचे सामाजिक, शैक्षणिक व राजकीय कार्य सर्वानाच माहीत आहे. त्याचा एक आणखीन एक प्रत्यय पुन्हा एकदा सर्वांसमोर आला आहे.


उरण तालुक्यातील पुनाडे गावातील चैतन्य म्हात्रे हा गरीब विद्यार्थी. त्याची इच्छा होती की इंजिनिअरिंग सारखे उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहायचे परंतु परिस्थिती अभावी त्याला ती शक्य नव्हते अशावेळी उरणचे दानशूर व्यक्तिमत्व माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी त्याला शैक्षणिक दत्तक घेऊन त्याच्या पहिल्या वर्षापासून त्याच्या सर्व फीची व्यवस्था मनोहरशेठ भोईर यांनी स्वतः केली.आणि यावर्षीही म्हणजे चौथ्या वर्षी(फायनल इयर ) सुद्धा त्याची फी चे पैसे चेकच्या स्वरूपात शनिवार दिनांक 17 जून 2023 रोजी त्याला सुपूर्त करण्यात आले.यावेळी शिक्षक सेनेचे कोकण कार्याध्यक्ष कौशिक ठाकूर व चंद्रकांत नारायण म्हात्रे हेही उपस्थित होते.थोडे नवीन जरा जुने