*उभ्या असलेल्या वाहनांतील डिझेलची चोरी करणाऱ्या त्रिकुटापैकी एकाला खारघर पोलिसांनी केली अटक*







उभ्या असलेल्या वाहनांतील डिझेलची चोरी करणाऱ्या त्रिकुटापैकी एकाला खारघर पोलिसांनी केली अटक* 
पनवेल दि.०७ (वार्ताहर) : रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या वाहनांतील डिझेलची चोरी करणाऱ्या त्रिकुटापैकी एकाला खारघर पोलिसांनी अटक केली आहे. सिराज इस्माईल पटेल असे या चोरट्याचे नाव असून पोलिसांनी त्याच्या दोन फरार साथीदारांचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी या चोरट्याची कार व त्याने चोरलेले ५०० लिटर डिझेल जप्त केले आहे.



          खारघर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई शरद उगले व पोलीस शिपाई पाटील सायन-पनवेल मार्गावरील खारघर टोल नाका येथे गस्त घालत असताना टोल नाक्याच्या पुढे काही व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना निदर्शनास आले. तेथे जाऊन पहाणी केली असता



, तीन व्यक्ती रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कंटनेरच्या टाकीतील डिझेल पाईपच्या सहाय्याने चोरत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांची चाहुल लागताच चोरट्यांनी पाईप व ड्रम त्याच जागी टाकून पलायन केले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत सिराज इस्माईल पटेल याला पकडले मात्र त्याचे दोघे साथीदार सलमान कल्दानी व फिरोज कल्दानी हे दोघेही पळून गेले. पोलिसांनी त्यांच्या वाहनाची तपासणी केली असता, त्यात ५०० लिटर डिझेलने भरलेले दोन ड्रम ठेवून आढळून आले. यावेळी डिझेलसह गाडी जप्त करून सिराज इस्माईल याला अटक करण्यात आली आहे.


थोडे नवीन जरा जुने