अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची केअर ऑफ नेचर संस्थेची पोलीस प्रशासनाकडे मागणी.
उरण दि 15(विठ्ठल ममताबादे )
उरण तालुक्यातील एकविरा मंदिर वेश्वी येथील केअर ऑफ नेचर रॉक अनिमल पार्कची अज्ञात व्यक्ती कडुन मोठ्या प्रमाणात नासधूस करण्यात आली आहे. त्यामुळे समस्त पर्यावरणप्रेमीं मध्ये संतापाची लाट उसळली आहे.केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणा-या संस्थेतर्फे रायगड जिल्ह्यात विविध भागात, विविध तालुक्यात निसर्ग, वन्यजीव संवर्धनाचे, संरक्षणाचे विविध उपक्रम राबविले जातात.
रॉक ऍनिमल हे एक निसर्ग सौदर्य स्थळ, पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास आले होते.मात्र दिनांक 14 जून 2023 रोजी सकाळी 8 च्या सुमारास केअर ऑफ नेचर संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर हे फेरफटका मारण्यास गेले असता पशुपक्ष्यांच्या, प्राण्यांच्या मूर्तीची कोणीतरी नासधूस केल्याचे त्यांना आढळले. मूर्ती तुटलेल्या अवस्थेत होत्या. एकविरा मंदिर येथे काही लोक पार्टी साठी आले होते आणि दारू पिऊन झाल्यावर त्या लोकांनी पुतळ्याची नासधूस केले असल्याचा संशय राजू मुंबईकर यांनी व्यक्त केला आहे.
Tags
उरण