जय गणेश फ्रेन्डस क्लब तर्फे अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे निवासी आदिवासी आश्रमशाळेत गरजेच्या वस्तू भेट








जय गणेश फ्रेन्डस क्लब तर्फे अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे निवासी आदिवासी आश्रमशाळेत गरजेच्या वस्तू भेट



 उरण दि. 9(विठ्ठल ममताबादे )उरण शहरातील कामठा येथील जय गणेश फ्रेंड्स क्लब यांच्या वतीने शांतीवन, पोस्ट- नेरे,तालुका पनवेल येथील अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे निवासी आदिवासी आश्रम शाळेला विद्यार्थ्यांसाठी अत्यंत गरजेची वस्तू स्वरूपात मौल्यवान असे 250 सतरंज्या आणि 250 बेडशीट भेट देण्यात आले.


तसेच या आश्रमशाळेला उरणमधील सामाजिक कार्यकर्ते तथा चित्रपट अभिनेता आनंद भरत ठक्कर यांनी विद्यार्थ्याच्या गणवेशासाठी सामाजिक बांधिलकी जपत 29,500 रुपये देणगी दिली आहे.योग्य वेळी योग्य मदत निःस्वार्थ भावनेने केल्याने कूष्टरोग निवारण समिती शांतीवनच्या अध्यक्षा रक्षा मेहता यांनी जय गणेश फ्रेंड्स क्लब व अभिनेता आनंद भरत ठक्कर यांचे आभार मानले आहेत.यावेळी प्रियवंदा तांबोटकर, दिपक दळी, योगेश म्हात्रे, चेतन ठक्कर, अमन थळी आदी मान्यवर उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने