डॉ. गिरीश गुणे यांचा 64 वाढदिवस उत्साहात साजरा.
डॉ. गिरीश गुणे यांचा 64 वाढदिवस उत्साहात साजरा.उरण दि 15(विठ्ठल ममताबादे )माणसातला देव अशी ज्यांची ख्याती आहे त्या डॉक्टर गिरीश गुणे यांचा आज गुरुवार दिनांक 15 जुलै रोजी वाढदिवस.डॉ गुणे यांना गुरुवर्य मानणाऱ्या, श्री साई संस्थान वहाळ चे संस्थापक अध्यक्ष रवीशेठ पाटील यांनी त्यांचे अभिष्टचिंतन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी त्यांच्या समवेत कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी चे संचालक बाळाराम पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल महानगरपालिका जिल्हा चिटणीस नगरसेवक गणेश कडू, सिटी बेल वृत्त समूहाचे समूह संपादक मंदार दोंदे,विवेक पाटील, दैनिक सामनाचे पत्रकार संजय कदम, शेकाप युवा नेता अविनाश मकास,मनोज म्हात्रे,विनय जाधव,श्री साई देवस्थान वहाळचे विश्वस्त मढवी गुरुजी ,कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी महिला सुरक्षा कमिटी अध्यक्ष माधुरी गोसावी मॅडम , उलवे रोड रोटरी प्रेसिडेंट शिरीष कडू , कर्नाळा टीव्हीचे संपादक रुपेश लोखंडे, लक्ष्मीकांत ठाकूर, मनोज म्हात्रे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना रवीशेठ पाटील म्हणाले की, मी गुणे सरांना गुरुवर्य मानतो यापेक्षा गुणे सरांनी मला शिष्य म्हणून स्थान दिले ही परम सुख देणारी गोष्ट आहे. आपल्याकडे जर का एखादी गोष्ट गरजेपेक्षा जास्त असेल तर ती समोरच्याला देण्यासाठी आपल्याकडे जास्तीची आहे! हा सिद्धांत आम्हाला गुणे सरांनी शिकवला. अविरत जनसेवेचे व्रत घेतलेल्या या व्यक्तीमत्वाने आज जन्मदिनी देखील क्षणाची उसंत न घेता पाच शस्त्रक्रिया केल्यानंतर आम्हाला अभिष्टचिंतना साठी वेळ दिली यातच त्यांच्या रुग्णसेवेसाठी वाहून घेतलेल्या व्रताचे परिपूर्ण दर्शन होते. गुणे सरांना दीर्घायुष्य लाभावे आणि त्यांच्या हातून अशीच अविरतपणे रुग्णसेवा घडत राहावी अशा मी त्यांना जन्मदिनी शुभेच्छा देतो.यावेळी डॉक्टर गिरीश गुणे यांना शुभेच्छा देताना नगरसेवक गणेश कडू म्हणाले की सरांच्या नावांच्या अद्याक्षरांच्यात तीन “जी” येतात.म्हणून रोटरी क्लब मध्ये त्यांना प्रेमाने थ्री जी म्हणतात,पण माझ्या लेखी ते फोर जी आहेत.कारण एक जी त्यांच्या नावाच्या अगोदर लागतो.आणि तो जी म्हणजे जी फॉर गॉड आहे. गरिबांचे कैवारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुणे सरांना जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.अशा शब्दात गणेश कडू यांनी भावना व्यक्त केल्या. गोर गरिबांकडुन कोणतेही फी अथवा पैसे न घेता आजपर्यंत हजारो गरीब रुग्णावर मोफत उपचार करणारे माणसातील देव म्हणून ज्यांची ख्याती आहे असे डॉ गिरीश गुणे यांना सर्वच स्तरातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आले आहेत.


थोडे नवीन जरा जुने