चांगल्या कामामुळे जनता उद्धवसाहेब ठाकरे,मनोहरशेठ भोईर व गणेश शिंदे यांच्या पाठीशी - विनायक राऊत







चांगल्या कामामुळे जनता उद्धवसाहेब ठाकरे,मनोहरशेठ भोईर व गणेश शिंदे यांच्या पाठीशी विनायक राऊत
शिवसेना उरण शहर शाखेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप, बालवाडीच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप व ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या वाटप कार्यक्रमाला जनतेचा उत्तम प्रतिसाद.




उरण दि 30(विठ्ठल ममताबादे )
शिवसेना उरण शहर शाखेच्या वतीने सामाजिक शैक्षणिक व आरोग्य विषयक कार्यक्रमाचे सामाजिक बांधिलकी जपत आयोजन केले जाते यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, गरजूंना मोफत वह्यांचे वाटप, बालवाडीच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप व जेष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप असे विविध उपक्रम दरवर्षी राबविले जात असतात, ही खूपच कौतुस्कापद व अभिमानाची बाब आहे. माजी आमदार मनोहरशेठ भोईर व माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे यांनी कोरोना काळातही रात्रंदिवस जनतेची सेवा केली. आजही ते उत्तमपणे कार्य करत आहेत. त्यामुळे संपूर्ण जनता ही मा. उध्दवसाहेब ठाकरें, माजी आमदार मनोहरशेठ भोईर,माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे यांच्या पाठिशी आहे असे गौरवोदगार खासदार विनायक राऊत यांनी काढले.



शिवसेना उरण शहर शाखेच्या च्या वतीने शनिवार दि 29/07/2023 रोजी सायंकाळी 6 वाजता सामाजिक व शैक्षणिक, आरोग्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित असलेले शिवसेना सचिव खासदार विनायक राउत यांनी उरण तालुका व उरण शहर शिवसेनेच्या कार्याचे कौतूक केले व विद्यार्थ्यांना खूप शिकून,चांगले शिकून मोठे व्हा असा मौलिक सल्ला दिला. यावेळी माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे यांनी आपल्या प्रस्तावनेत गेली 40 वर्षाहून जास्त वर्षे शिवसेना उरण तालुका व उरण शहरच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य विषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गोर गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य अभावी शिक्षण थांबू नये यासाठी शैक्षणिक साहित्य वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांचा गुण गौरव करण्यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारचा कार्यक्रम तर जेष्ठ नागरिकांचे पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून छत्री वाटप असे कार्यक्रम राबवित असतो. या सर्व कार्यक्रमांना जनतेचा नेहमी उत्तम प्रतिसाद मिळतो असे सांगत गणेश शिंदे यांनी प्रस्तावनेतून कार्यक्रम घेण्या पाठीमागची भूमिका स्पष्ट केली





. माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनीहीआपल्या मनोगतात त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शिवसेना उरण तालुका व उरण शहर शाखेचे वतीने राबवले जाणाऱ्या कार्यक्रमाचे कौतुक केले.येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना पूर्ण ताकतीनिशी निवडणुकीला सामोरे जाऊन उरण नगरपालिकेवर भगवा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी केले.जिल्हा संपर्क प्रमुख बबन दादा पाटील यांनी मनोगतात त्यांनी उरण शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक करत भाजप वर जोरदार प्रहार केला. यावेळी उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, उरण विधानसभा संपर्कप्रमुख महादेव घरत, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, पंचायत समिती सदस्य दिपक ठाकूर, उपतालुका प्रमुख प्रदिप ठाकूर , माजी तालुकाप्रमुख आत्माराम गावंड,उपतालुका संघटक के एम घरत, उरण शहर प्रमुख विनोद म्हात्रे, शहर संपर्क प्रमुख गणेश म्हात्रे, नगरसेवक अतूल ठाकूर, द्रोणागिरी शहर प्रमुख जगजीवन भोईर, शिक्षक नेते नरेश मोकाशी, ग्राहक संरक्षण कक्ष तालुका संघटक धीरज बुंदे,शहर संघटक संदीप जाधव महिला आघाडी उपजिल्हा संघटिका ममता पाटील, उपतालुका संघटिका मनीषा ठाकूर, रंजना तांडेल, विभाग प्रमुख एस के पुरो, घारापुरी माजी सरपंच बळीराम ठाकूर व नितीन ठाकूर हे उपस्थित होते.





कार्यक्रमाचे आयोजन शहर संघटक दिलीप रहाळकर, उपशहर प्रमुख कैलास पाटील, अरविंद पाटील, गणेश पाटील, शहर तालुका संघटक सुजाता गायकवाड, नगरसेविका वर्षा पाठारे,शहर संघटिका मेघा मेस्त्री, शहर संघटिका विना तलरेजा, शहर संपर्क संघटिका श्रीमती वंदना पवार, उपशहर संघटिका माधुरी चव्हाण, विभाग संघटिका रूपा सिंग, कल्पना गराडे, शाखा संघटिका संगीता लोलगे, रजनी लोलगे, कविता गाडे, संजना कोष्टी, अल्पसंख्याक सेल विधानसभा अध्यक्ष एजाज मुकादम, तालुकाध्यक्ष हुसेना शेख, उपाध्यक्ष रुबीना कुट्टी,ग्राहक संरक्षण कक्षाचे विभागप्रमुख वैभव करंगुटकर, गणेश शेलार शैलेश पंडित,माजी शहर संघटक प्रवीण मुकादम, शाखाप्रमुख अजय म्हात्रे, आबा नार्वेकर, कपिल फसाटे फत्तेखान, गटप्रमुख उपेंद्र गुडेकर, संदीप चव्हाण, ज्येष्ठ कार्यकर्ते नंदू पाटील, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या व उरण शहरातील शिवसैनिक यांनी केले होते



. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुलाबपुष्प, सन्मानचिन्ह देऊन यथोचित गौरव करण्यात आले. तर गरिब गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांचे पावसांपासून संरक्षण व्हावे यासाठी छत्र्यांचे वाटप करण्यात आले.तसेच बाल वाडीतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. श्री राम मंदिर सभागृह विद्यार्थी, पालक, नागरिकांनी भरून गेले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उत्तम निवेदक म्हणून सुपरिचित असलेले महेश गावंड यांनी केले.


थोडे नवीन जरा जुने