गार्डन हॉटेल जवळ झाड पडले उन्मळून






गार्डन हॉटेल जवळ झाड पडले उन्मळून
पनवेल दि.२६ (वार्ताहर) : पनवेल शहरातील पायोनीअर विभाग येथील गार्डन हॉटेल जवळ अनेक वर्षे जुने झाड अचानक उन्मळून विद्युत वाहिनीवर पडले. सुदैवाने यामध्ये जीवित हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक तथा भाजपा जिल्हा सरचिटणीस नितीन जयराम पाटील, सोशल मीडिया संयोजक प्रसाद हनुमंते, प्रसाद कंधारे, विनीत मढवी, महेश सरदेसाई, सचिन नाझरे यांनी सदर स्थळी जाऊन झाड हटवण्यासाठी मदत कार्य केले.




गार्डन हॉटेल वरून येणारा स्वामी नित्यानंद मार्ग मुख्य रस्त्यामध्ये मोडत असल्याने यावर कायम रहदारी असते. त्यामुळे पालिका कर्मचारी, अग्निशमन दलाचे अधिकारी पाटील आणि त्यांचे कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले तर वाहतूक पोलीस उपनिरीक्षक गणेश खांडेकर यांच्या सहयोगाने रस्ता वाहतुकीसाठी लवकर मोकळा करण्यात आला.


थोडे नवीन जरा जुने