पनवेल दि.०३ (संजय कदम) : छत्रपती शिवाजी महाराज कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यातील कराड येथे जिजाऊ वस्तीगृह येथे मुला-मुलीना शालेय शिक्षण साहित्य वाटप करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज कामगार सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच भारतीय जनता पार्टी कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यातील कराड येथील कोळे-शिंगणेवाडी येथील जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या जिजाऊ वसतिगृहात मुलांना वही व पेन या शालेय शिक्षण साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज कामगार सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष निलेश पाटील, कराड तालुका संघटक प्रदिप पाटिल, कराड दक्षिण सचिव सचिन कुंभार आणि कराड मधिल सर्व सदस्य उपस्थित होते.
Tags
पनवेल