भरधाव गाडी खड्ड्यात पडून झालेल्या अपघातात १ ठार तर ४ जखमी


भरधाव गाडी खड्ड्यात पडून झालेल्या अपघातात १ ठार तर ४ जखमी
पनवेल दि.०३ (संजय कदम) : मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावर आज सकाळी पनवेल तालुक्यातील भाताण परिसरात भरधाव कार स्लीप होऊन कारची शोल्डर लेनच्या रेलिंगला ठोकर लागून कार खड्ड्यात जाऊन पलटी होऊन झालेल्या अपघातात १ ठार तर ४ जण जखमी झाले आहेत.
              पनवेल तालुक्यातील भाताण परिसरात मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावरील मुंबई लेनवर आज सकाळी टाटा सफारी (क्र एमएच ११ बीएच ३१७३) वरील चालक तुषार महानवर हा त्याच्या ताब्यातील कार भरधाव वेगाने जात असताना कार स्लीप झाल्याने त्याचा कार वरील ताबा सुटल्याने कारची शोल्डर लेनच्या रेलिंगला ठोकर लागली. त्यानंतर कार रोडचे डावे बाजूस पलीकडे खाली खड्ड्यात जाऊन पलटी मारली. या अपघातामध्ये कारमधील प्रवाशी उज्वला धडस (वय 47) या मयत झाल्या असून कारमधील इतर प्रवाशी प्राजक्ता धडस (वय 26), वैभव धडस (वय 29), रामचंद्र धडस (वय 57) व कारचालक तुषार महानवर (वय 37, सर्व राहणार विक्रोळी, मुंबई) हे गंभीर जखमी झाले आहेत. 


या अपघाताची माहिती मिळताच पीएसआय बुरकुल व पळस्पे महामार्ग मोबाईल वरील पथक, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण व आयआरबीचे पथक, यांनी घटनास्थळी भेट देत अपघात ग्रस्त इसमांना एम्बुलेंसच्या मदतीने एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे उपचारकरिता दाखल केले. तसेच महामार्गावरील वाहतूक सुरळीत चालू आहे.थोडे नवीन जरा जुने