बोधचिन्ह व नावाचा गैरवापर
नवी मुंबई महानरपालिकेच्या नाव व बोधचिन्ह चा गैरवापर अज्ञात व्यक्तीने केला आहे. नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर 15 ते 18 च्या उद्यानात अश्लाघ्य भाषेचा वापर करून बॅनर लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
यामध्ये कचरा टाकल्यास कारवाई नाही तर थेट घोडा लावण्यात येईल अश्या भाषेचा वापर करण्यात आलाय. ह्यावर पालिकेला कळताच सदर ठिकाणचा बॅनर पालिकेने काढून टाकला आहे. व हा पलिकेच्या वतीने बॅनर लावण्यात आला नव्हता असे स्पष्ट केले आहे. यासंदर्भात पालिकेच्या वतीने पोलीस स्टेशन मध्ये तक्रारार नोंदविण्यात आली आहे.
Tags
नवी मुंबई