श्री. जनार्दन प्रितम म्हात्रे इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्त बांधवांच्या तात्पुरता निवारा केंद्रात आज सपत्नीकभेट घेतली





श्री. जनार्दन प्रितम म्हात्रे


इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्त बांधवांच्या तात्पुरता निवारा केंद्रात आज सपत्नीक गेलो होतो. तेथील लहान मुली आणि महिलांशी माझ्या पत्नीने वैयक्तिकरित्या संवाद साधला त्यानंतर आम्ही दोघांनी निर्णय घेतला की आमच्या जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून बोलल्याप्रमाणे या बांधवांपैकी काही जणांना शैक्षणिक आणि रोजगारामध्ये पालकत्व स्वीकारावे.




याबाबत आज खालापूर विभागीय तहसीलदार, प्रांत आणि रायगड जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष लेखी स्वरूपात मागणी केली, ज्यामध्ये कुटुंबाचे छत्र हरपलेल्या तेथील 3 लहान बहिणी त्यांच्या शिक्षणाचा भार उचलणे, त्याचबरोबर तेथील 7 तरुणांना त्यांच्या क्षमतेनुसार नोकरी सुद्धा देण्यास तयार आहे. शासनाकडून सद्य परिस्थितीत करण्यात आलेल्या तेथील व्यवस्थेबाबत आम्ही माहिती देखील घेतली.




थोडे नवीन जरा जुने