प्राथमिक आरोग्य केंद्र कोप्रोली उरण येथे प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत व जागतिक लोकसंख्या दिन कार्यक्रम संपन्न.





प्राथमिक आरोग्य केंद्र कोप्रोली उरण येथे प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत व जागतिक लोकसंख्या दिन कार्यक्रम संपन्न.


उरण दि 11(विठ्ठल ममताबादे ) दिनांक 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियाना अंतर्गत निश्चय मित्र योजनेअंतर्गत , इंडियन ऑइल अदानी वेंचर लिमिटेड कंपनी उरण यांनी तालुक्यातील कोप्रोली व गव्हाण प्रा. केंद्र अंतर्गत असणारे क्रियाशील टीबी रुग्णांना त्यांच्या सी आर एस फंडातून कंपनीने 125 रुग्णांना सहा महिन्याकरता दत्तक घेऊन पोषण आहार व प्रोटीन युक्त धान्यचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आयओटीएल कंपनीचे एस आर गणेशन, डायरेक्टर फायनान्स अतुल खराटे, भूपेश शर्मा, मिलिंद मोघे, संदीप काळे, श्रीमती नाजनीन शेख, प्रफुल्ल म्हात्रे



,श्रीमती शिवानी राठोड तसेच या कार्यक्रमासाठी डॉक्टर वंदन कुमार पाटील जिल्हा क्षयरोग अधिकारी, समीर आठावकर गटविकास अधिकारी पंचायत समिती उरण,डॉक्टर राजेंद्र इटकरे तालुका आरोग्य अधिकारी उरण,डॉक्टर राज चव्हाण वैद्यकीय अधिकारी कोप्रोली, डॉक्टर अस्मिता बोंबटकर वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र गव्हाण, डॉक्टर श्रीमती काजल लकडे वैद्यकीय अधिकारी नागरी आरोपी केंद्र उरण, तालुक्यातील सर्व वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणारे कर्मचारी आशा गटप्रवर्तक व ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता असे क्षय रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष परदेशी तालुका आरोग्य सहाय्यक उरण यांनी केले.


थोडे नवीन जरा जुने