निष्ठावंत शिवसैनिक विकास पेटकर यांची कळंबोली शिवसेना { उध्दव बाळासाहेब ठाकरे } पक्षाच्या उपविभागप्रमुख पदी नियुक्तीनिष्ठावंत शिवसैनिक विकास पेटकर यांची कळंबोली शिवसेना { उध्दव बाळासाहेब ठाकरे } पक्षाच्या उपविभागप्रमुख पदी नियुक्ती  
पनवेल दि. ३० ( वार्ताहर ) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्हाप्रमुख शिरीष घरत व रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांच्या आशीर्वादाने कळंबोली शहरप्रमुख सुर्यकांत म्हसकर यांच्या उपस्थितीत निष्ठावंत कार्यकर्ते विकास पेटकर यांची कळंबोली ग्रामीण उपविभागप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. 


             विकास पेटकर यांनी आतापर्यत केलेल्या सामाजिक व राजकीय कार्याची दखल वरिष्ठांनी घेऊन त्यांच्यावर उपविभागप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली असून संघटनात्मक कार्य करतांना संघटनेच्या हिताची जपवणूक करावी व पक्षाचे कार्य वाढवावे असे आवाहन कळंबोली शहरप्रमुख सुर्यकांत म्हसकर यांनी यावेळी केले आहे . 


        

थोडे नवीन जरा जुने