रोटरी स्कुल येथे वृक्षारोपण






रोटरी स्कुल येथे वृक्षारोपण
पनवेल दि.१८ (संजय कदम) : रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊन, दाऊदी बोहरा जमात पनवेल, इनरव्हील क्लब आणि रोटरॅक्ट क्लबतर्फे नवीन पनवेल येथील रोटरी स्कूल येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी चंपा, बुगनविलिया आणि कडुनिंबाची ६० झाडे लावण्यात आली.



 वृक्ष हे पर्यावरणातील खूप महत्वाचा भाग आहेत. भरपूर प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे वनक्षेत्र कमी होत आहे. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउन, दाऊद बोहरा जमात पनवेल, इनरव्हील क्लब आणि रोटरॅक्ट क्लबतर्फे नवीन पनवेल येथील रोटरी स्कूल येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी चंपा, बुगनविलिया आणि कडुनिंब या प्रजातींची ६० झाडे परिसरात लावण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी रोटरी ट्रस्ट चेअरमन अरविंद सावळेकर, संजय जैन मित्र मंडळाचे अध्यक्ष संजय जैन, अलियासगर वोहरा, सैफुद्दीन पनवेलवाला, अलीभाई गोलवाला आणि इतर सदस्य उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने